झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी

DMart News: अवघ्या 10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या झेप्टो आणि ब्लिंकिटच्या सुपरफास्ट वेगाला ब्रेक लावण्यासाठी आता डी मार्टने थेट औषध बाजारात दमदार प्रवेश केला आहे. स्वस्त दरात किराणामाल देऊन बाजारावर वर्चस्व गाजवणाऱ्या डी मार्टची मूळ कंपनी, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सने आता अत्यंत गुप्तपणे थेट फार्मसी रिटेल व्यवसायात पाऊल टाकले आहे.

मुंबई आणि आसपासच्या एमएमआर (MMR) भागातील निवडक स्टोअर्समध्ये कंपनीने हा नवा प्रायोगिक उपक्रम सुरू केला असून, आपल्या नेहमीच्या स्वस्ताईच्या पॅटर्ननुसार ग्राहकांना औषधांवर थेट 20% इतकी मोठी सरसकट सूट देण्यास सुरुवात केली आहे. घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्विक कॉमर्स ॲप्सच्या वाढत्या प्रभावाच्या काळात डी मार्टची ही नवी शक्कल संपूर्ण गेम कसा बदलणार, याचीच चर्चा आता कॉर्पोरेट जगतात सुरू झाली आहे.

काय आहे नवी शक्कल?

हा नवा व्यवसाय वाढवण्यासाठी डी मार्टने एक अत्यंत हुशारीची रणनीती आखली असून त्यासाठी ‘शॉप-इन-शॉप’ हे मॉडेल वापरले आहे. औषध विक्रीसाठी बाजारात कोणतीही स्वतंत्र किंवा नवीन जागा भाड्याने न घेता, डी मार्टच्या ज्या स्टोअर्समध्ये ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी असते, तिथेच आतमध्ये खास फार्मसी काऊंटर्स सुरू करण्यात आले आहेत.

यामुळे जागा खरेदीचा किंवा भाड्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च तर वाचला आहेच, पण त्याचसोबत डी मार्टमध्ये येणाऱ्यालाखो ग्राहकांपर्यंत कोणत्याही अतिरिक्त जाहिरातीशिवाय थेट पोहोचणे कंपनीला सहज शक्य झाले आहे. किराणा मालाप्रमाणेच येथेही ‘एव्हरीडे लो प्रायसिंग’ हीच रणनीती कायम ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome