Sonam Wangchuk Health News : आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांचं वजन सातत्याने कमी होत आहे. शुक्रवारी (१७ जुलै) त्यांच्या उपोषणाचा २० वा दिवस होता. ज्यानंतर त्यांना जंतर-मंतरवरुन सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २८ जूनपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी अन्न त्यागलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात त्यांचं वजन ३५० ग्रॅमपेक्षा अधिक कमी झालं आहे. आता त्यांचं वजन ५६.५५ किलो आहे. आतापर्यंत त्यांचं वजन एकूण ९.५ किलोने कमी झालं आहे.

मेडिकल टीमने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ रिपोर्टनुसार, वांगचूक यांचा रक्तदाब १०८/६८ mm Hg, साखर ८० mg/dl, पल्स रेट ७२ प्रति मिनिट आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन ९६ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता दिसून येत आहे. मात्र त्यांची मानसिक स्थिती सामान्य आणि सतर्क आहे. जाणून घेऊया अचानक किती किलो वजन कमी झाल्याचे मृत्यूची भीती असते?
बीबीसी सायन्सच्या एका वृत्तानुसार, शेवटचं अन्न पोटात गेल्याच्या एक-दोन दिवसांनंतर शरीरात लिव्हर आणि मसल्समधील जमा ग्लाइकोजन संपुष्टात येतं. यानंतर शरीर ऊर्जेसाठी जमा झालेल्या फॅटचा वापर केटोनमध्ये करतं. मात्र ब्रेन आणि रेड ब्लड सेल्ससाी केवळ केटोनचा उपयोग होत नाही. यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते, ज्यासाठी शरीर स्नायूंचं विघटन करण्यास सुरुवात करतं. शरीराला अन्न न मिळाल्याने केवळ फॅटच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या स्नायूही कमकुवत होऊ लागतात. यामध्ये हृदयाच्या स्नायूंचाही समावेश आहे. जर हे स्नायू अशक्य झाले तर हृदय काम बंद होऊ शकतं आणि ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.