हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमधील ‘हा’ सूक्ष्म फरक ओळखा, हृदयविकाराबाबत डॉक्टरांचा गंभीर इशारा

Heart Attack Vs Panic Attack: अचानक घाबरल्यासारखे होणे, हृदयाची धडधड वाढणे, घाम येणे आणि आता जीव जातो की काय? अशी भीती वाटणे ही लक्षणे दिसू लागताच सामान्यतः प्रत्येक व्यक्तीच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे हार्ट अटॅक. पण प्रत्येक वेळेस छातीत होणारी धडधड हार्ट अटॅकच असते असे नाही, काही प्रकरणांत पॅनिक अटॅक देखील असू शकतो. पॅनिक अटॅकची लक्षणं काही अंशी हार्ट अटॅकसारखीच असतात. ज्यामुळे लोक प्रचंड घाबरतात. या दोघांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.  प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ नवीन अग्रवाल यांनी या दोन्ही समस्यांमधील महत्त्वाचा फरक आणि कोणती काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे

पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय आहे?

डॉ नवीन अग्रवाल यांच्या मते पॅनिक अटॅकचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी असतो.
कारणे: अतिप्रमाणात मानसिक ताणतणाव नैराश्य किंवा तीव्र भावनिक दबावामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो काही वेळा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय देखील हा अटॅक येऊ शकतो.
लक्षणे: अचानक घाबरल्यासारखे होणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक मृत्यूची भीती वाटणे यांचा समावेश होतो.
मेडिकल टेस्ट: विशेष म्हणजे पॅनिक अटॅक आलेल्या रुग्णाची ईसीजी इको किंवा इतर हृदयविकाराशी संबंधित चाचण्या केल्यास त्या सर्व पूर्णपणे नॉर्मल येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome