संवाद यात्रेत भटके विमुक्त एकवटले मुंबई पुणे, मराठवाडा विदर्भातून आले सोलापूरात…..

भटके विमुक्त आदिवासी यांची संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन – रुक्मिणी नागापुरे

संवाद यात्रेत भटके विमुक्त एकवटले मुंबई पुणे, मराठवाडा विदर्भातून आले सोलापूरात…..

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २ सप्टेंबर – डवरी, मदारी, बहुरूपीसह अनेक घटक एकत्र आले. अंगावर फटके मारत कला दाखवत पोतराज निघाले. पारधी, भिल्ल चोर नाही, माणूस हाय, माणूस हाय. आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आशा घोषणा देत लक्ष वेधले.

गुन्हेगारी जमाती कायद्यातून मुक्त करण्याला ७२ वर्षे होत आहेत. आजही भटके विमुक्त आदिवासी यांना जात, वर्ग या आधारावर विषमतेला सामोरे जावे लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार असे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. याकडे शासनाचे लक्ष वेधावे म्हणून भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघाली.

या संवाद यात्रेत आपल्या उद्देशाचे पोस्टर लावून पुढे राज्यभरातून आलेले समाज घटक निघाले. त्यांच्यामध्ये गोसावी, बहुरूपी, मदारी अशा अनेक घटकांनी आपली कला दाखवली. पार्क चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही संवाद यात्रा निघाली. या संवादयात्रेच्या वाहनापुढे डवरी, गोसावी, बहुरूपी, मंदारी बांधव आपली कला दाखवत निघाले. भगिनी समाज शॉपिंग सेंटरमार्गे सिद्धेश्वर प्रशाला येथून पूनम गेटवर ही यात्रा घोषणा देत थडकली. यात्रेत अॅड. अरुण जाधव, शरद बाराथे, मुमताज शेख, भावना वाघमारे,यशवंत फडतरे, बाबूसिंग पवार, रमेश खाडे, अशोक अगावणे, राहुल गवारे, एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे, यांनी या संवाद यात्रेत राज्यातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले असून एकल महिला संघटनाच्या सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.एकल महिला संघटना ही जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी व सोलापूर जिल्ह्यातुन संवाद यात्रेत सहभागी होणार आहे

वीस जिल्ह्यांतून जाणार संवादयात्रा

■ आजवर या भटक्या विमुक्तांनी मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या मागण्यांचे एक प्रतीकात्मक गाठोडे प्रशासनाला देऊन जागे करण्याचा प्रयत्न या संवाद यात्रेतून झाला.

■ मुंबई, पुणेसह विदर्भ, मराठवाडातून काही घटक अर्थात जवळपास ३०० जण या संवाद यात्रेत सहभागी झाले होते. राज्यभरात २० जिल्ह्यांतून साडेतीन हजार किलोमीटर ही संवाद यात्रा फिरणार आहे. २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढून या संवाद यात्रेचा समारोप केला जाणार आहे.

Welcome