सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचा आढावा दौरा : सोलापूर रेल्वे विभागातील विविध विकास कामांची पाहणी….

सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक :- रेल्वे विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध विकास कामे पूर्णत्वास जात आहेत. यामध्ये अमृत भारत योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी सोलापूर विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी केली. यामध्ये सोलापूर रेल्वे विभागातील विविध कामांचे निरीक्षण करत सोलापूर-कलबुर्गी दरम्यान विंडो ट्रेलिंग पाहणी केली. त्याचप्रमाणे कलबुर्गी रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत चालू असलेल्या कामांची पाहणी केली. सदर सुरू असलेल्या कामाबद्दलची सद्यस्थितीची माहिती सहाय्यक विभागीय अभियंता गति शक्ति आशिष शाहू यांनी व्यवस्थापकांना दिली. हिरेनांदूर रेल्वे स्थानकावर चालू असलेल्या नॉन-इंटरलॉकिंग वर्कची पाहणी देखील यावेळी त्यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे एन गुप्ता,वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) जगदीश, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी पी. रामचंद्रन,विभागीय सिग्नल ऍण्ड टेलिकॉम अभियंता आयुष मेहेतो, सहाय्यक विभागीय इलेक्ट्रिक अभियंता असद प्यारे या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.