बहिणेने भावाच्या मनगटावर बांधली अतुट नात्याची राखी….शहर परिसरातील शाळेत रक्षाबंधन सण सजरा…..

मनपा शाळेत रक्षाबंधन आनंदात साजरा…

बहीणेने भावाच्या मनगटावर बांधली अतुट नात्याची राखी….

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दि १७ ऑगस्ट – बहीण भावाचा अतूट नात्याच पवित्र बंधन मनजे रक्षाबंधन होय. हाच पवित्र रक्षा बंधन सण शहरातील मनपा देशमुख शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      रक्षाबंधन या दिवशी लाडकी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते, आणि भावाच्या मनगटावर राखी बांधते भावाला आशिर्वाद देते. याच सणानिमित्त मनपा देशमुख वस्ती शाळेतील चिमुकल्या बच्चेकंपनीनी आपल्या लाडक्या भावाला राखी आणली होती. मुलांनी ही आपल्या लाडक्या बहीणीसाठी छान गिफ्ट आणले होते.शाळेतील मुलींनी छान आरती ताट सजावट केली होती. छान रांगोळी काढली होती.

  यावेळी चिमुकल्या मुलींनी आपल्याच वर्गातील मुलांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना मिठीई खाऊ घातली. मुलांनी देखील बहिणीच्या पाया पडून त्याचं आशिर्वाद घेतले. त्याच प्रमाणे शिक्षक यांना ही मुलींनी राख्या बांधल्या अतिशय आनंदी पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला…

शाळेमध्ये मुलांना विविध सणांचे महत्व कळावे आणि त्याबाबत माहिती मिळावी यासाठी उपक्रम साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने भावा बहिणीचे अतूट नाते असणारा रक्षाबंधन सणाचे महत्व कळावे यासाठी हा सण दरवर्षी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती व्हावी यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात.

– राहुल पाटील , मुख्याध्यापक मनपा देशमुखवस्ती शाळा सोलापूर.

आम्ही आमच्या घरामध्ये रक्षाबंधन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो. तसेच शाळेमध्ये देखील हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. शाळेतील भावांसाठी आम्ही राख्या आणतो. आणि ते आमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतात एक वेगळा आनंद यातून आम्हाला मिळतो. 

– अदिती बंडू खुर्द , विद्यार्थिनी मनपा देशमुखवस्ती शाळा सोलापूर.

Welcome