निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज चेंबरला फुलं वाहून केले आंदोलन…. सावधान पुढे धोका आहे…केले स्प्रे पेंटिंग

महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर…..

निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज चेंबरला फुलं वाहून केले आंदोलन….सावधान पुढे धोका आहे…केले स्प्रे पेंटिंग 

 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि २१ जून -सोलापूर शहरातील विविध भागात ड्रेनेज चेंबरची केलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अपघाताचा धोका संभवत आहे. सदरच्या कामासाठी कारणीभूत असणाऱ्या महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मधला मारुती बाजारात ड्रेनेज चेंबर भोवती डेंजर चित्र स्प्रे पेंटिंग द्वारे काढून पुढे धोका आहे असे लिहिण्यात आले त्यानंतर त्यावर रांगोळी काढून फुले वाहण्यात आली आणि प्रतीकात्मक पूजा केली. दरम्यान धिक्कार असो धिक्कार असो महापालिका प्रशासनाचा अधिकार असो असो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत सारा बाजार परिसर दणाणून सोडला होता. महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने शहरातील विविध ठिकाणी अशी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यामुळे नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 महापालिका प्रशासन संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदस्य आंदोलन केले असून यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या माध्यमातून दिला आहे.

शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख महेश धराशिवकर 

महापालिका प्रशासनाने तसेच संबंधित मक्तेदाराने बोगस कामे करून बिले लाटण्याचे पाप केले आहे निष्पाप जनता टॅक्स भरत असताना त्यांना अशा यातना सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे यापुढे अधिक तीव्र आंदोलन करत राहू .

प्रताप चव्हाण शिवसेना ठाकरे गट माजी शहरप्रमुख

Welcome