शहर मध्य मतदार संघ महाविकास आघाडी कडून शिवसेनेला सोडवून घेतला जाईल – संपर्क प्रमुख अनिल कोकीळ
शिवसेना ठाकरे गट लढणार मध्य विधानसभा : शिवसेनेचा भगवा सप्ताहात एल्गार

सोलापूर व्हिजन वृत्तसेवा
सोलापूर दि २६ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सोलापूर शहर जिल्ह्यात दि. २० ते २७ जुलै या का व 27 जुलै 2024 रोजी भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना सोलापूर शहर मध्य मतदार संघातील सर्व उपशहरप्रमुख बैठक संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. सोलापूर शहरातील मध्य मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मध्य मतदार संघ महाविकास आघाडी कडून शिवसेनेला सोडवून घेतला जाईल. लोकसभा निवडणूकीत शिवसेना म्हणून खा. प्रणिती शिंदे यांना मताधिक्य दिला आहे.
त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना म्हणून लढणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या बैठकीत सांगितले. यापूर्वी शहर मध्य मतदार संघात याअगोदर पुरषोत्तम बरडे, माजी आ. दिलीप माने, माजी आ. शिवशरण पाटील बिराजदार हे आमदार राहिले आहेत. मध्य मतदार संघ सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या कडे एक लवकरच शिष्टमंडळ जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक यंत्रणा सक्षम करण्यासाठी, स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार, नियमित पाणीुरवठा, असे विविध विषय व विधानसभा निवडणूकिवेळी शिवसेना नेते आ. सुनील प्रभू, शिवसेना नेते विश्वनाथ नेरूरकर, माजी खा. विनायक राऊत, पश्चिम महाराष्ट्र शिवसेना नेते प्रा.नितीन बानगुडे – पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात येणार असे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सांगितले.
सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित प्रभागात नवीन शाखांचे उद्घाटन, प्रत्येक प्रभागात ज्या जून्या शाखांचे तेथे फलक, नवीन शाखांचे उद्घाटन या भगव्या सप्ताहात करण्यात येणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या निवडणुकीत सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहे.याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, दत्ता माने, उपशहरप्रमुख अमीत भोसले, तुषार खंदारे, रेवण बूक्कणूरे, रेवण पुराणिक, नानासाहेब मोरे, कुदूर चंद्रकांत मानवी, बालाजी विठ्ठलकर, सोमनाथ बंदपट्टे, अनिल दंडगुले, अंबादास चव्हाण व विभागात सर्व उपशहरप्रमुख, विधानसभा मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी विभागप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते उपस्थित होते.