शरद – प्रतिभा प्रतिष्ठानकडून शारदाई सन्मान सोहळा

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान : शरद – प्रतिभा प्रतिष्ठानकडून शारदाई सन्मान सोहळ्याचे आयोजन 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि २७ जून – संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आठ महिलांचा शारदाई सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे अशी माहिती अध्यक्ष प्रशांत बाबर आणि सचिव दीपक राजगे यांनी दिली.

 

 

 

 या सोहळ्यात माढ्याच्या नगराध्यक्ष ॲड. मीनल साठे, मंगळवेढ्याच्या उद्योजिका डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, आहार तज्ञ डॉ. सोनाली घोंगडे, वालचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ विजया महाजन, चार्टर्ड अकाउंटंट डॉ. नेहा भट्टड, माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख, प्राची महिला बचत गटाच्या नीता गवळी, योगशिक्षिका अनिता कोडमूर या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शारदाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, पुष्गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

                          दरम्यान शनिवार 29 जून रोजी सकाळी 10.30 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्याहस्ते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश गादेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच ३० जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत हॉटेल सिटी पार्क येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे आणि रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

Welcome