नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात तळले पकोडे….

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अनोखे आंदोलन

– नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात तळले पकोडे 

सोलापूर दी २५ जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी रस्त्यांवर उतरला आहे. शहरात नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात अनोख्या पद्धतीने पकोडे तळून आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेत भ्रष्टाचार सरकर जबाबदार अशा घोषणा देत घटनेचा निषेध व्यक्त केला. देशभरात झालेल्या नीट घोटाळ्यामुळे अनेक  विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सरकारच्या पारदर्शकतेर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केली.

बयावेळी युवती अध्यक्ष डॉ प्रतीक्षा चव्हाण, विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष आशम फुलमामडी, शेरू कुरेशी,समर्थ लवटे,शाहरुख़ हुच्चे, मतीन बागवान,सादिक मुजावर, समर्थ वोरा, नूर नदाफ,अजिंक्य गवळी,संज्योत निकंब,अक्षय जाधव,,रियाज शेख, रेहान शेख आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Welcome