सोलापुरात शिवसेना आक्रमक खा. ओवेसींच्या प्रतिमेला घातला जोड्यांचा हार…..

सोलापूर दी २५ जून – देशाच्या लोकशाही मंदिरात खासदारकीची शपथ घेताना एम.आय.एम.पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार असस्सुद्दिन ओवेसी यांनी भीम जय मीम आणि शेवटी जय फिलिस्तीन असा नारा दिला. त्या नाऱ्याचे विपरीत पडसाद सोलापुर शहरात उमटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी ओवेसी यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला चपलाचा प्रतीकात्मक हार घालण्यात आला. यावेळी ओवेसी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोड्यांचा मार देण्यात आला.
दरम्यान ओवेसी यांनी लोकशाहीच्या मंदिरात अर्थात देशाच्या सर्वोच्च संसदेत सर्व सदस्यांसमोर दिला आहे. त्यांच्या या नाऱ्याने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सोलापूरात लागलीच याचे परिणाम जाणवला आहे. यावेळी आंदोलनात संजय सरवदे, नाना मस्के, राजकुमार शिंदे, मनीषा नलावडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एम.आय.एम.चे ओवेसी हे कायमच पाकिस्तानची बाजू घेऊन बोलतात त्यांनी संसदेमध्ये दिलेला जय फिलिस्तान हा नारा निषेधार्थ आहे. त्यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा.
अमोल शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख