सोलापूर शहरात विधानसभेचे वाहू लागले वारे…. पोस्टरसह सोशल मीडियावर घुमतोय विजय मालकांचा पाचवा विजय…

कितीही ओरडू दया स्वकियांसह विरोधी बेंच…!
विजय मालकांच मतदारांनी केलाय विजयी पंच फिक्स…!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ९ ऑगस्ट – सध्या सोलापूर शहरात आगामी विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग लावून उमेदवारी आम्हालाच मिळेल. या आशेत पोस्टरबाजी बॅनरबाजी सुरू केली आहे. अशातच आता विद्यमान आमदार देखील मागे सरकलेले त्यांनीदेखील सोशल मीडिया काबीज करत आपल्या दमदार कामगिरीचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची मांदियाळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट , राष्ट्रवादी शरद पवार गट , त्यांच्या सोबतीला आता महाराष्ट्र निर्माण सेना , बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच विविध अपक्ष आणि छोटे पक्षांचे उमेदवार देखील आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पडेल असा आशावाद व्यक्त करत आहेत.
शहरात विविध ठिकाणी भावी आमदार …..,आमचं ठरलंय……, यंदा आम्हीच आमदार……, असं विविध पोस्टर पाहण्यास मिळत आहेत. यामध्ये इच्छुकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात आहे. इच्छुक सोशल मीडिया, बॅनरबाजी करण्यात व्यस्त असताना चालू आमदार मागे कुठे राहतील…, मग त्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लावली आहे.. उत्तर ते दक्षिण मध्य विधानसभेच्या निवडणुकीत आपला वेळा ठसा उठवण्यासाठी अनेक कार्य सिद्धीस दिले जात आहेत. सोशल मीडिया आणि बॅनर यांच्या माध्यमातून आपल्या विकास कामांचा कीत्ता गिरवला जात आहे.
शहर उत्तर मधून विजय मिळवण्यास इच्छुक असणाऱ्या विजय मालकांना यंदाची विधानसभा कठीण जाईल असे संकेत मिळत आहेत. त्यांच्या पराभवासाठी गंगा ते राधाश्री पर्यंत बैठकांचा सिलसिला आणि नेत्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त या उक्तीप्रमाणे…. विरोधकांनी विजय मालकांचा विजयी रथ पंच गाठण्यापासून रोखण्यास मोठी मोट बांधली आहे. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र आहे. स्वकीयांसह विरोधकांना उत्तर देण्यास शहर उत्तरची फळी तयार झाली आहे..
कितीही ओरडू दया स्वकियांसह विरोधी बेंच…!
विजय मालकांच मतदारांनी केलाय विजयी पंच फिक्स…!
असे आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शहर उत्तर मध्ये विजय मालकांना यंदाची निवडणूक खरोखर जड जाईल का? मतदारांनी ठरवल्याप्रमाणे विजय पंच फिक्स होईल? हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे