जनतेचा कौल यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवणार निर्धार मेळाव्यात आवळली वज्रमूठ

सोलापूर व्हिजन वृत्तसेवा
सोलापूर दि २६ जून – आगामी विधानसभा निवडणुक दृष्टिक्षेपात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने माजी आमदार नरसय्या आडम यांचे नाव जाहीर केले असून त्यासाठी आडम मास्तर यांनी
आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पदाधिकाऱ्यांना भेटून शहर मध्यची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी केली आहे. तत्पूर्वी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे ज्यांच्याकडून देखील त्यांनी सदरची जागा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मागितली त्यामुळे आडम मास्तर यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकत निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात कामगारांनी तसेच महिलांनी एकमुखी घोषणा देत जनतेचा कौल यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवणार निर्धार मेळाव्यात करत वज्रमूठ आवळली आहे.
महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली आहे.जनतेच्या हिताला मूठमाती दिली आहे.त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फर्तपणे कौल दिलेला आहे याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे.त्यास मी बांधली राहीन असे नम्रपणे ऋण निर्देश अडम मास्तर यांनी निर्धार मेळाव्यात व्यक्त केले.
बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी १० वा. अक्कलकोट रोड, महालक्ष्मी मंदिर लगत कै. बोमड्याल सभागृह येथे माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही ? यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला. यावेळी मेळाव्यात उपस्थित महिलांनी तसेच कामगारांनी आडम मास्तर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असे आवाहन केले.
यावेळी सिद्धेश्वर मंजूळकर , अनिल द्यावरशेट्टी,सुजाता सरळगी,शालन तेलतुंबडे,उमा धोत्रे,मंदाकिनी कस्सा,संध्या कांबळे,पुष्पा येमुल,रेखा त्रिमल आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले. यानंतर कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे दिलेल्या कौलाचे स्वागत करत सर्वांचे जाहीर आभार मानले.
यावेळी व्यापीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲड.एम.एच. शेख , राज्य समिती सदस्य नसीमा शेख,सिद्धप्पा कलशेट्टी, रे नगर फेडरेशन चे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते,लिंगव्वा, सोलापूरे,मुरलीधर सुंचु, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे सूत्रसंचालन आभर प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.