महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले :- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे प्रतिपादन
आगामी विधानसभा निवडणुक एकजुटीने लढू : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची वज्रमूठ

सोलापूर व्हिजन वृत्तसेवा
सोलापूर दि २६ जून – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि संघटन महासचिव के सी वेणुगोपाल, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
सदरच्या बैठकीत आगामी विधानसभा आणि लगेच होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर प्रगल्भ चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी सर्वच निवडणुकांत काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी दिली. यावेळी दिल्लीतील पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जनतेने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल आनंद व्यक्त केला गेला तो अधिक दृढ व्हावा यासाठी मार्गदर्शन केले.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला यांची ग्वाही
दरम्यान बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले येत्या १४ जून रोजी मुंबईमध्ये आगामी विधानसभा निवडणुका संदर्भात आणखीन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत निवडणुकाबाबत योग्य पद्धतीने चर्चा विनिमय केले जाईल. तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनेतेने मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानत लोकसभे प्रमाणेच विधानसभा आणि विधान परिषदेसाठी देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल अशी ग्वाही रमेश यांनी दिली.

राज्यातील महायुती सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. भ्रष्ट सरकारला बाहेर काढण्यासाठी एकजुटीने काम करू. शेतकऱ्यांसोबत घेऊन आंदोलन छेडू विविध मागण्यासाठी आग्रही भूमिका मांडत जनतेमध्ये जाऊन काम करू असा आशावाद देखील व्यक्त केला.