भाजपने देश तोडण्याचे काम केले :- माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा काँग्रेस निरीक्षक कृष्णा तीरथ यांचा घणाघात आरोप !

मतदारांनी साथ दिल्यास महिला सक्षमीकरणासह आरोग्य रोजगार आणि शिक्षण यावर भर देणार :- तीरथ
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,
सोलापूर, दि. १६ ऑक्टोंबर – देशातील आणि राज्यातील भाजप सरकारने नेहमीच जात पात पंथ धर्म यांच्या जोरावर देशामध्ये विभाजन केले. देश तोडण्याचे काम केले. त्यामुळे देशात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र महागाई वाढली आहे विश्वास यांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत गरजा उपलब्ध होत नाहीत. देशातील महिला आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिला व लहान मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित राहणार आहे. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी यावर कोणतीच ठोस उपाययोजना केली नाही. असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या निरीक्षक तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री कृष्णा तीरथ यांनी केला आहे. ते काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

त्या पुढे म्हणाल्या की, देश प्रगतीपथावर न्यायचा असेल, तर देशातील महिला व बालकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्या, तर येणारी नवीन पिढी सक्षम होईल, आणि पर्यायाने देश सक्षम होईल, असे सांगतानाच तीरथ यांनी भाजप सरकारने देश विकण्यास काढला आहे. दोन श्रीमंत व्यक्ती देश विकत घेत आहेत. मात्र यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे. आत्ताच पार पडलेल्या हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसून आले. भाजपवर मतदार नागरिक नाराज असताना देखील तेथे पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येते, यावर आमचा संशय असून त्यासंबंधी चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या जागा लढवायच्या, किती जागा वाटाघाटीत मागायच्या, यावर हायकमांड निर्णय घेईल. सध्या यावर चर्चा सुरू असून लवकरच बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक महाराष्ट्र राज्यामध्ये देखील सरकार नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून भुरळ घालत आहे. काँग्रेस सरकारने यापूर्वी असे केले नव्हते. एवढी अराजकता आणि ध्रुवीकरण वाढलेले आहे. त्यामुळे जनतेने यावर निर्णय घेऊन काँग्रेस तसेच काँग्रेसचे गटबंधन याला निवडून द्यावे असे आवाहन देखील यावेळी तीरथ यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस भवन येथे कृष्णा तीरथ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक दिलीप माने, कार्याध्यक्ष नंदकुमार पवार आदींसह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकी महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा शिक्षण व रोजगार हे मुद्दे घेऊन लढणार.
देशात आणि पर्यायाने राज्यात महिला सक्षमीकरण तसेच आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. महिलांना प्रत्यक क्षेत्रामध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे. भाजप सरकारने महिलांना केवळ भुरळ घातली आहे. विविध योजना राबवून मुख्य प्रवाहापासून त्यांना तोडले आहे. जर काँग्रेस पुरस्कृत गठबंधनला मतदारांनी साथ दिल्यास या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात काम करता येणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, आणि रोजगार हे मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे.
– कृष्णा तीरथ, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा सोलापूर काँग्रेस निरीक्षक