हाफीज अब्दुल सादिक मौलाना यांनी उपस्थितांना दिला त्याग समर्पण कुर्बानी यांचा संदेश… बकर ईद निमित्त झाली सामूहिक नमाज अदा

आसार ईदगाह मैदानावर कामगारांनी अदा केली सामूहिक नमाज …. हाफीज अब्दुल सादिक मौलाना यांनी उपस्थितांना दिला त्याग समर्पण कुर्बानी यांचा संदेश…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दिनांक बकर ईद अर्थात ईद-उल-जुहाचे मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व आहे. यादिवशी सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर शहरातील आसार ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी हाफीज अब्दुल सादिक मौलाना यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना बकर ईदची सामूहिक नमाज अदा केली. यावेळी चिमुकल्या बच्चेकंपनीने देखील सामूहिक नमाज अदा केली. दरम्यान आसार कमिटी ट्रस्टच्या वतीने सामूहिक नमाज अदा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मौलाना यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्याग समर्पण कुर्बानी यांचा संदेश दिला.  कामगारांसाठी विशेष करून याचे आयोजन ट्रस्ट करते. असेही यावेळी सांगितले.

 दरम्यान या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे. बकरी ईद साजरी करण्यामागे इतिहास आणि काही मान्यता आहेत.

इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले.हजरत इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळात पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र, अल्लाहचा आदेश मानून ते त्यांचा मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते. अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही. इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले होते, तेव्हा रस्त्यात त्यांची एका व्यक्तीशी भेट झाली.

रस्त्यात भेटलेला इसम त्यांना म्हणाला की, आता या वयात तुम्ही तुमच्या मुलाला का कुर्बान करायला निघाला आहात? त्याचे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनही डगमगू लागले आणि ते विचारात पडले. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी अल्लाहला वचन दिले आहे. मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देताना आड येऊ नये, म्हणून त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा हसता-खेळताना दिसला. अल्‍लाहने चमत्‍कार केला आणि मुलाच्या जागी ‘दुंबा’ कुर्बान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि ‘दुंबा’ (बकरी मधली एक प्रजाती)कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. आणि ती कायम राहिल.(कायमत पर्यंत)असे सांगितले जाते.

हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधव इब्राहिमला रस्ता चुकविण्यास सहाय्यभूत ठरलेल्या एका ठिकाणी सैतान ग्राह्य धरुन त्याला आपल्या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी दगड मारतात. कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियाच्या घरात किंवा गरजूंना देण्याची प्रथा आहे.

का साजरी केली जाते बकरी ईद :- ईद-उल-जुहाचे पर्व हिजरीच्या (सन) अंतिम महिन्यात जुल हिज्जमध्ये साजरा केले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव मक्कामध्ये (साउदी अरब) एकत्र येऊन हज यात्रा साजरी करतात. ईद-उल-जुहाचा अर्थ त्यागाची (कुर्बानी)ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे. बकरी ईद साजरी करण्यामागे इतिहास आणि काही मान्यता आहेत.

इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. अल्लाहने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वांत प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले.हजरत इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळात पुत्रप्राप्ती झाली होती. मात्र, अल्लाहचा आदेश मानून ते त्यांचा मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते. अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही. इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले होते, तेव्हा रस्त्यात त्यांची एका व्यक्तीशी भेट झाली.रस्त्यात भेटलेला इसम त्यांना म्हणाला की, आता या वयात तुम्ही तुमच्या मुलाला का कुर्बान करायला निघाला आहात? त्याचे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनही डगमगू लागले आणि ते विचारात पडले. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी अल्लाहला वचन दिले आहे. मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देताना आड येऊ नये, म्हणून त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी डोळ्यांवरील पट्टी हटवल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा हसता-खेळताना दिसला. अल्‍लाहने चमत्‍कार केला आणि मुलाच्या जागी ‘दुंबा’ कुर्बान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि ‘दुंबा’ (बकरी मधली एक प्रजाती)कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. आणि ती कायम राहिल.(कायमत पर्यंत)असे सांगितले जाते.

हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधव इब्राहिमला रस्ता चुकविण्यास सहाय्यभूत ठरलेल्या एका ठिकाणी सैतान ग्राह्य धरुन त्याला आपल्या हज यात्रेच्या शेवटच्या दिवशी दगड मारतात. कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियाच्या घरात किंवा गरजूंना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. बकरी ईदनंतर २० दिवसांनी इस्लामिक नववर्ष चा पहिला महिना मोहरम सुरू होतो.

Welcome