शहरासह ग्रामीणमधील विविध नामांकित महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी झाली प्रसिद्ध : विज्ञान शाखेसाठी ८५ टक्क्यांचे लागले मेरिट

वाणिज्य शाखेसाठी ७० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाले. दुसरीकडे मात्र, कला शाखेतील प्रवेशासाठी शिक्षकांना धडपड करावी लागत आहे.
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक:-दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची सत्ता लागली होती. शहरातील विविध नामांकित महाविद्यालयामध्ये पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शास्त्र विभागासाठी संगमेश्वर महाविद्यालयात ८८ दयानंद महाविद्यालयात ८५ तर वालचंद कॉलेजमध्ये ८७ टक्के इतका कट ऑफ लागला. दहावी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शहरातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती अर्ज भरल्यानंतर प्रकाशास्त्र व वाणिज्य शाखेची पैकी व तया री आहे शहरातील नामवंत विद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा उघडा वाढलेला दिसत आहेत.


गुणवत्ता याद्यांचे वेळापत्रक
दुसरी गुणवत्ता यादी : २७ जून (२७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश)
तिसरी गुणवत्ता यादी : ५ जुलै (५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश)
विशेष फेरी : ९ जुलै (शिल्लक जागांनुसार प्रवेश)
‘विनाअनुदानित’साठी २० हजार रुपयांपर्यंत शुल्क!
इयत्ता दहावीत ६८ ते ७३ टक्क्यांपर्यंत गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून जवळ किंवा त्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात अनुदानितमधून प्रवेश मिळणे कठीण आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली आहे. पण, तेथेही विद्यार्थ्यांची गर्दी असल्याने काही महाविद्यालयांनी विनाअनुदानित प्रवेशासाठी १५ ते २० हजार रुपयांचे शुल्क आकारणी सुरू केल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे.